मुंबई- राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून २४ तासात २४ हजार ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १९ हजार ५२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमध्ये संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.
-
राज्यात आज 24619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन19522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 812354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 301752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यात आज 24619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन19522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 812354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 301752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 17, 2020राज्यात आज 24619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन19522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 812354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 301752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 17, 2020
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली आहे. राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ३९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के आहे.