ETV Bharat / state

१४ व्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या.. - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक विजयी महिला

यावेळच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जरी आत्तापर्यंतची उत्तम असली तरी ही पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेशी नक्कीच नाही. निवडून आलेल्या महिला आमदारांनाही राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

महिला आमदार
author img

By

Published : Oct 25, 2019, 4:38 PM IST

मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुका दणक्यात पार पडल्या. २०१९च्या या निवडणुकीत अनेक उलटफेर पहायला मिळाले. निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या ही यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे.

विधानसभेच्या २८८ जागांपैकी २४ जागा महिला उमेदवारांनी पटकावल्या आहेत. २३५ महिला निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाल्या होत्या. एकूण आकड्याच्या तुलनेत २४ ही संख्या कमी वाटत असली तरी यावेळी सर्वांत जास्त महिला विधानसभेत गेल्या आहेत. महिला आमदारांच्या संख्येतही भाजपने बहुमत मिळवले आहे. २४पैकी १२ महिला आमदार भाजपच्या आहेत. काँग्रेसच्या ५, राष्ट्रवादीच्या ३, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी २ महिला आमदार निवडून आल्या आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार अदिती तटकरे या २४ महिलांपैकी सर्वात तरूण आमदार आहेत.

मागील ४० वर्षांचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, यावेळची २४ ही संख्या सर्वात जास्त आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने २० महिलांना विधानसभेवर पाठवले होते. दुष्काळी वर्ष म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या १९७२च्या निवडणुकीत ५६ महिला उमेदवारांपैकी एकीलाही विजय मिळवता आला नाही. १९६२ मध्ये ३६ पैकी १३ महिलांनी विजय मिळवला होता. सरासरीच्या तुलनेत १९६२ची विधानसभा ही महिला आमदारांसाठीची सर्वात जास्त यशस्वी मानली जाते.

यावेळच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जरी आत्तापर्यंतची उत्तम असली तरी ही पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेशी नक्कीच नाही. निवडून आलेल्या महिला आमदारांनाही राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिला राजकारणात कधी सक्रिय होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे.

या आहेत विजयी महिला आमदार -

वर्षा गायकवाड - धारावी
प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य
प्रतिभा धानोरकर - वरोरा
सुलभा खोडके - अमरावती
यशोमती ठाकूर - तिवसा
सरोज अहिरे - देवळाली
सुमनताई पाटील - तासगाव-कवठेमहंकाळ
अदिती तटकरे - श्रीवर्धन
मंदा म्हात्रे - बेलापूर
मनिषा चौधरी - दहिसर
विद्या ठाकूर - गोरेगाव
भारती लव्हेकर - वर्सोवा
माधुरी मिसाळ - पर्वती
मुक्ता टिळक - कसबापेठ
देवयानी फरांदे - नाशिक मध्य
सीमा हिरे - नाशिक पश्चिम
श्वेता महाले - चिखली
मेघना बोर्डीकर - जिंतूर
नमिता मुंदडा - केज
मोनिका राजळे - शेवगाव
यामिनी जाधव - भायखळा
लता सोनवणे - चोपडा
गीता जैन - मीरा-भाईंदर
मंजुळा गावित - साक्री

Intro:Body:

women won in assembly election of maharashtra

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.