मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 227 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 30 पोलीस अधिकारी तर 197 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 22 पोलीस कर्मचारी व 8 पोलीस अधिकारी बरे झाले असून मुंबई पोलीस खात्यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 22 पोलीस अधिकारी व 172 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सध्या सुरू आहेत.
राज्यभरात 22 मार्च ते 30 एप्रिल या काळात 87000 गुन्हे दाखल झाले असून क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 628 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 167 घटना घडल्या असून याप्रकरणी 627 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण नंबरवर आतापर्यंत 81615 फोन आले आहेत. अवैध वाहतूक संदर्भात 1240 गुन्हे दाखल करण्यात आले असून 15845 जणांना अटक करून तब्बल 50827 वाहने जप्त करण्यात आली आहेत.