ETV Bharat / state

Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat : लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरला, 22 जागांवर शिंदे गट लढवणार निवडणूक - लोकसभा निवडणुकीवर राहुल शेवाळेचे विधान

भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाकडून लोकसभेच्या जागांविषयी मोठे विधान करण्यात आले आहे. शिंदे गट आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 22 जागांवर उमेदवार देणार असल्याचे विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 26, 2023, 9:25 AM IST

Updated : May 26, 2023, 10:36 AM IST

मुंबई : कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांचे आणि जाणकारांचे लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष काय डावपेच आखणार यावर आता चर्चा सर्वत्र घडू लागली आहे. अशात भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाकडून लोकसभेच्या जागांविषयी मोठे विधान करण्यात आले आहे. शिंदे गट आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 22 जागांवर उमेदवार देणार असल्याचे विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या जागा फॉर्म्युलाच्या चर्चेनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या जागा वाटपाची चर्चा जोर धरू लागली आहे.

वर्षा बंगल्यावर 22 जागा घेण्याची भाषा : कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात लोकसभा 2024 ची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष हे आपआपली रणनीती तयार करत आहेत. लोकसभेत भाजपला शह देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. तर राज्यातील महाविकास आघाडी जागा वाटपासाठी चाचपणी करत आहे. आता भाजपसोबत सत्तेत असलेला शिंदे गटाची शिवसेना कामाला लागली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीविषयी खासदारांसोबत चर्चा झाली. तसेच शिवसेना लोकसभेत 22 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. भाजप आणि शिंदे गट लोकसभेसाठी कशाप्रकारे जागा वाटप केले जाणार याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांना दिली.

बैठकीत शिंदे गटाचं काय ठरलं : बुधवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या खासदारांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती देताना शेवाळे म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कामांचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीत विजय मिळेल, विजय मिळण्यास फायदा होईल असे काय करता येईल, यावरदेखील चर्चा झाली.

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? : महाविकास आघाडीमध्येही लोकसभेच्या जागा वाटपावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यांचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या देखील माध्यमात आल्या होत्या. आता शिंदे-फडणवीस सरकारचाही लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरल्याचा सांगण्यात येत आहे. लोकसभेसाठी भाजप 22 जागांवर उमेदवार देणार तर शिंदे गटाची शिवसेना 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्याविषयी चाचपणी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व लोकसभा मतदारसंघात कामे केली जाणार आहेत. तर भाजपही मेळावे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेने मागील वेळी ज्या २२ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यासर्व २२ जागांसाठी तयारी करण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच १३ विद्यमान खासदारासह इतर जागांचाही आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. - राहुल शेवाळे, खासदार

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Inauguration: आता फक्त 6 तासात नाशिककरांच्या दारी येणार नागपूरची संत्रा बर्फी, समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्धाटन
  2. New Parliament Building: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन सोहळ्याला 250 खासदारांचा विरोध
  3. Pandharpur Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी डिजाईन तयार; 2700 कोटींचा आराखडा मंजूर, फडणवीस यांची मोठी घोषणा

Last Updated : May 26, 2023, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.