मुंबई - रविवारी मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 85 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 27 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. याबरोबरच मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 69 हजार 693 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 147 वर पोहचला आहे. तसेच मुंबईमधून आज 902 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 30 हजार 918 वर गेला आहे. सध्या मुंबईत 30 हजार 271 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवस तर सरासरी दर 1.24 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 557 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करुन सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 983 इमारती आणि इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 15 हजार 789 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
- अशी वाढली रुग्णसंख्या -
दिनांक | रुग्णसंख्या |
2 सप्टेंबर | 1622 |
3 सप्टेंबर | 1526 |
4 सप्टेंबर | 1929 |
5 सप्टेंबर | 1735 |
6 सप्टेंबर | 1910 |
7 सप्टेंबर | 1788 |
8 सप्टेंबर | 1346 |
9 सप्टेंबर | 2227 |
10 सप्टेंबर | 2371 |
11 सप्टेंबर | 2172 |
12 सप्टेंबर | 2321 |
13 सप्टेंबर | 2085 |