ETV Bharat / state

NAAC Assessment : नॅक मुल्यांकन नसलेल्या 2000 महाविद्यालयांमध्ये होणार प्रवेशबंदी, विद्यार्थांना शैक्षणिक फटका - नॅक मूल्यांकन प्रक्रिया बंधनकारक

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे राज्यात 2 हजार खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांनी पुनर्मुल्यांकन केलेले नाही. जर 31 मार्चपर्यंत हे केले नाही. तर प्रथम वर्षीच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बंद होतील अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

naac revaluation
न्याक पुनर्मुल्यांकन
author img

By

Published : Mar 5, 2023, 11:18 AM IST

मुंबई : नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, माजी विद्यार्थी सहयोग अशा वेगवेगळया निकषांवर मूल्यांकन करून महाविद्यालयाला दर्जानुसार श्रेणी प्रदान केली जाते.उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रिया बंधनकारक करण्यात आले आहे. तरी सुद्धा राज्यातील हजारो खाजगी महाविद्यालयांनी हे मुल्यांकन केले नाही. परिणामी चूक महाविद्यालयाची आणि सजा विद्यार्थ्यांना का म्हणून असा सवाल आता विद्यार्थी संघटना शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

एकदाही ‘नॅक’ मुल्यांकन न केलेल्या संस्था : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषेदकडून आतापर्यंत एकदाही मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे. प्रोव्हिजनल अ‍ॅवक्रिडिटेशन फॉर कॉलेजेस असे या योजनेचे नाव आहे. या मूल्यांकनाची मुदत दोन वर्षांसाठी होती. राज्यातील पारंपरिक महाविद्यालयांपैकी 2000 विनाअनुदानित महाविद्यालयांनी आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना आता मूल्यांकन करून घ्यावे लागेल. अन्यथा, त्यामधील पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे शासनाने ठरवलेले दिसत आहे.

करोना काळात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया मंदावली : कोरोना काळात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती. मात्र राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांपैकी बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालयांनी आतापर्यंत नॅक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या फेब्रुवारीच्या आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात विनाअनुदानित 2,139 महाविद्यालयांपैकी केवळ 138 महाविद्यालयानी ही प्रक्रिया केली आहे. याचा अर्थ 2000 महाविद्यालयानी ही प्रक्रिया केलीच नाही.

महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचा विद्यार्थ्यांना फटका : या संदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे विद्यार्थी विकास शिंदे यांनी म्हटले की, महाविद्यालयांनी मूल्यांकन केले नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. चूक महाविद्यालयांची आणि शिक्षा विद्यार्थ्यांनी का म्हणून भोगावी? राज्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे. अल्प उत्पन्न गट, सामाजिक आर्थिक दुर्बल गट यांच्या घरातून येणारी मुले त्यांना जर प्रवेश रद्द केले गेले किंवा बंद केले गेले तर त्यांचे शैक्षणिक वर्षाचा नुकसान होणार आहे.

मूल्यांकनामध्ये अनेकदा घोळ : अखिल भारत शिक्षा अधिकार मंचाचे अक्षय पाठक यांनी म्हटले आहे की, मूल्यांकनामध्ये अनेकदा घोळ होतो. त्यामध्ये अनेकदा भ्रष्टाचार देखील झाल्याचे ऐकायला मिळते. त्याबद्दल विविध वाद होतात. परंतु मूल्यांकन महाविद्यालयांनी केले नाही म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा का? जर असे झाले तर आम्हाला लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

हेही वाचा : Water Supply Cut In Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ३ दिवस होणार १० टक्के पाणी कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.