मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकून पडली आहे. १३ तासांपासून 700 प्रवासी रेल्वेमध्ये अडकले होते. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे पोलीस, शहर पोलीस आणि एनडीआरएफने कंबर कसली. भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर आणि नौदलाचे पथकही मदतीसाठी आले होते. आता अडकेलल्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वे भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून प्रवाशांना बाहेर निघता येत नव्हते. सर्व प्रवाशांची तात्पुरती व्यवस्था बदलापूर येथे करण्यात आली आहे.
LIVE UPDATE -
- महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका.
- पुन्हा पाऊस सुरु झाल्याने बचावकार्यात अडथळे
- सह्याद्री मंगल कार्यालय, बदलापूर येथे महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनतर सर्व प्रवाशांना कोल्हापूरला पोहचवण्यात येईल - प्रशासन
- खराब हवामानामुळे वायू दल आणि नौदलाच्या पथकाने बचाव कार्य थांबवले, हवाई पहाणी करुन गेले माघारी
-
Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: All passengers have been evacuated safely. #Maharashtra pic.twitter.com/ZddQlpnzZm
— ANI (@ANI) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: All passengers have been evacuated safely. #Maharashtra pic.twitter.com/ZddQlpnzZm
— ANI (@ANI) July 27, 2019Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: All passengers have been evacuated safely. #Maharashtra pic.twitter.com/ZddQlpnzZm
— ANI (@ANI) July 27, 2019
-
- रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना सोडविण्यासाठी मुख्यमत्र्यांचे राज्याच्या मुख्यसचिवांना आदेश. सुटकेसाठी बचावकार्यात स्व:त लक्ष घालण्याच्या दिल्या सुचना. ४ एनडीआरएफ पथके बचावकार्य करत असल्याची दिली माहिती.
- महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकेलल्या ६०० प्रवाशांची सुटका, उर्वरीत प्रवाशांचीही लवकरच सुटका होणार
- आत्तापर्यंत २२० जणांना सुखरुप बाहेर काढले
- बचाव पथकाने आत्तापर्यंत ११७ लहान मुले आणि महिलांना वाचवले आहे.
- वायू दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी रवाना
- १३ तासांपासून प्रवासी रेल्वेमध्ये अडकले. मदतकार्य सुरू
- 8 बोटींद्वारे अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यास एनडीआरएफ पथकाने केली सुरुवात
- रल्वे अधिकारी, पोलीस आणि मेडिकल पथक अतिरिक्त विभागीय रेल्वे अधिकारी एन. पी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथे तळ मांडून आहे. संपर्कासाठी - 8828119001
- महिला आणि लहान मुले घाबरून गेले आहेत
- प्रवाशांच्या मदतीसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे, तहसीलदार देशमुख घटास्थळी आले आहेत.
- ट्रॅक वर पाणी असल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस सामटोली जवळ उभी आहे.
- भारतीय वायु दलाचे हेलिकॉप्टर आणि नौदलाचे पथक मदतीसाठी येत आहे.
- एखादा फूट पाणी वाढले तर रेल्वे मध्ये पाणी शिरेल, सर्व प्रवासी घाबरले आहेत. मदतीसाठी कोणीही येत नसल्याने सर्व प्रवासी घाबरलेले आहेत, त्यातच पावसाचा जोरही वाढला आहे, असे एका प्रवाशाने सांगितले.
- घाबरुन जाऊ नका. ४ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाईल, असे पोलीसांनी प्रवाशांना सांगितले आहे.
- रेल्वे रुळावर पाणी साठल्यामुळे प्रवाशांना बाहेर निघता येत नाही. बऱयाच वेळापासून प्रवासी अडकून पडल्यामुळे अन्न पाण्याविना प्रवाशांचे हाल होत आहेत.
- पोलिसांनी सर्वप्रथम प्रवाशांना पाणी आणि बिस्कीटांचे वाटप केले. तसेच बचावकार्याला सुरुवात केली आहे. मागील १२ तासांपासून प्रवासी रेल्वेमध्ये अडकले आहेत.
- रेल्वे मधून बाहेर न पडण्याचे आवाहन मध्ये रेल्वेने केले आहे. रेल्वेमध्येच तुम्ही सुरक्षित आहात. रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफच्या पुढील आदेशाची वाट पाहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.