मुंबई Mumbai News : लंडन दौऱ्यावर जाणाऱ्या आमदारांमध्ये भारतीय जनता पक्ष,काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी या पक्षासोबत अपक्ष आमदारांचाही समावेश असणार आहे. हे 12 आमदार लंडनमध्ये जाऊन तेथील वर्ल्ड स्क्रीनिटी सेट डेव्हिड या विद्यापीठांमध्ये तेथील सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करणार आहेत. दौऱ्यातील चांगल्या गोष्टींचा आपल्याकडील धोरणांमध्ये समाविष्ट करण्याची सूचना हे शिष्टमंडळ करणार आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात करायची, हे सरकारवर अवलंबून असेल. 20 ते 25 नोव्हेंबर असा पाच दिवसांचा हा दौरा असणार आहे. विशेष म्हणजे मंत्री तसंच सत्ताधारी आमदारांच्या विदेश दौऱ्यावर टीका करणारे विरोधी नेते आता एकमेकांसोबत लंडन दौऱ्यावर जात असल्यानं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागे टीका, आता एकत्र : राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी लंडन दौऱ्यावर एकत्र जाणार असून ते तेथील सुशासनाचा अभ्यास करणार आहेत. तसंच कार्डिफमधील सेनेट असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना देखील हे सर्व आमदार भेट देणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री आणि नेत्यांच्या विदेशवारीवरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर सरकारला काही दौरे रद्द करावे लागले होते. आता ठाकरे गटाचे नेते, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेदेखील सत्ताधारी आमदारांसोबत लंडनवारी करणार असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
- दौऱ्यामध्ये 'या' आमदारांचा असेल समावेश : दरम्यान, या 12 आमदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पंकज भोयर, अमित साटम, मंगेश चव्हाण, मिहिर कोटेचा, जयकुमार रावल, तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अस्लम शेख, अमीन पटेल, झिशान सिद्दिकी, अमित झनक, तर समाजवादी पार्टीचे रईस शेख, अपक्ष सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.
हेही वाचा -
- मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करा - राम कदम यांचं ट्विट, तर मुनगंटीवार म्हणाले निरर्थक
- Maratha Reservation Protest : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापासून आमच्या जीवितास धोका, मराठा आंदोलकांचा आरोप
- Rohit Pawar On BJP : शरद पवारांच्या बनावट ओबीसी प्रमाणपत्रावरुन रोहित पवार काय म्हणाले, वाचा सविस्तर