मुंबई - राज्यात कोरोना व्हायरस संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या दरम्यान लॉकडाऊन, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 08 हजार 707 गुन्हे दाखल केले आहेत. राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 807 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 319 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला. याप्रकरणी 881 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 8 हजार 483 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 877 पोलिस अधिकारी तर 7 हजार 606 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1919 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत आहेत. यामध्ये 210 पोलीस अधिकारी, तर 1709 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 6471 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये 660 पोलीस अधिकारी, तर 5811 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 93 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 7 पोलीस अधिकारी तसेच 86 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात, अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 31 हजार 752 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 94 हजार 031 वाहने जप्त केली आहेत. तब्बल 16 कोटी 93 लाख 16 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 55 घटना घडलेल्या आहेत.
लॉकडाऊन काळात राज्यात 2 लाखांहून अधिक गुन्हे दाखल - maharashtra police
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 8 हजार 483 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 877 पोलीस अधिकारी तर 7 हजार 606 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1919 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत आहेत. यामध्ये 210 पोलीस अधिकारी, तर 1709 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 6471 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.