ETV Bharat / state

आज...आत्ता...बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे...कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात; खडसेंचा सरकारला घरचा आहेर... कोणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प लिक केला; जयंत पाटलांचा विधानसभेत सवाल...राजकारण पेटले; ममता पाठोपाठ भाजपवाल्यांचा नवनीत राणांना जय श्रीरामचा मजकूर लिहून पोस्टकार्ड पाठवले आहे...शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन . . .

बातमी, सर्वांच्या आधी...
author img

By

Published : Jun 19, 2019, 2:07 PM IST

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आज (बुधवार) बिनविरोध निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्या अध्यक्षपदाचा ठराव मांडला होता. त्याला सर्व पक्षाच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. या निवडीबद्दल बिर्ला यांनी सभागृहाचे आभार मानले. वाचा सविस्तर -

कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात; खडसेंचा सरकारला घरचा आहेर

मुंबई - सरकार निर्णय घेत असते. मात्र, त्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. वाचा सविस्तर -

पावसाळी अधिवेशन : कोणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प लिक केला; जयंत पाटलांचा सवाल

सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार घोषीत होऊन वितरण झाले नसल्याचा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावर अधिवेशन काळात या पुरस्काराचे वितरण करणार असल्याचे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी दिले. वाचा सविस्तर -

राजकारण पेटले; ममता पाठोपाठ भाजपवाल्यांचा नवनीत राणांना 'जय श्रीराम'

अमरावती - लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये भाजप खासदारांनी जय श्रीरामचे नारे लगावल्या प्रकरणी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी आता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जय श्रीरामचा मजकूर लिहून खासदार नवनीत राणा यांना एक पोस्टकार्ड पाठवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जय श्रीरामवरून राजकारण पेटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर -

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन . . .

मुंबई - मराठी माणसाची अस्मिता जागवणाऱ्या शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आज मुंबईतील शीव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाचा नेता वर्धापन दिनाला शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. वाचा सविस्तर -

Intro:Body:

AKSHAY - BULLETIN 2 PM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.