ETV Bharat / state

संतापजनक..! मुंबईत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक

एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मानखुर्दच्या कोविड सेंटरमध्ये घडल्याने खबळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या दिपेश साळवी (वय २०) याला अटक केली आहे.

17 years minor girl physically abuse at Quarantine Center in mumbai
संतापजनक..! मुंबईत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
author img

By

Published : Sep 15, 2020, 11:06 AM IST

Updated : Sep 15, 2020, 2:01 PM IST

मुंबई - कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर अद्यापही प्रशासनाचे अंकूश नसल्याचे समोर आले आहे. याचा प्रत्यय मुंबईतील मानखुर्द कोविड सेंटरमध्ये पाहायला मिळाला. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कोविड सेंटरमधील सॅनिटायझरींग करणाऱ्या तरुणाने विनयभंग केला. या घटनेने पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिपेश सूर्यकांत साळवी (वय 20) याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पालिकेच्या एम पूर्व विभागात येणाऱ्या मानखुर्द पीएमजीपी कोविड सेंटरमध्ये एक १७ वर्षीय तरुणी उपचार घेत आहे. त्या कोविड सेंटरमध्ये दिपेश सॅनिटायझरींगचे काम करतो. त्याने रुम सॅनिटायझर करण्याचा बहाण्याने रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित मुलगी एकटीच होती. त्याने त्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत, तू माझ्याशी प्रेम कर, असे सांगितले. तेव्हा मुलीने दिपेशच्या कानशिलात लगावली आणि जोरात आरडाओरडा करायला सुरूवात केली. तेव्हा सेंटरमधील इतर लोक जमले आणि त्यांनी दिपेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिपेश साळवीवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या वारंवार घडणाऱ्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - 'महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं, की घरीच मरावं?'

Last Updated : Sep 15, 2020, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.