ETV Bharat / state

कोरोना अपडेट: महाराष्ट्रात शनिवारी ३८७४ नवे रुग्ण, १६० जणांचा मृत्यू - कोरोना व्हायरस बातमी

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के एवढा आहे. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

160-deaths-and-highest-single-day-rise-of-3874-new-covid19-cases-reported-in-maharashtra-today
महाराष्ट्रात शनिवारी ३८७४ नवे रुग्ण, १६० रुग्णांचा मृ्त्यू
author img

By

Published : Jun 21, 2020, 1:44 AM IST

मुंबई- राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. शनिवारी ३८७४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी १३६ रुग्ण मुंबईतील आहेत. सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १३८० रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के एवढा आहे. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात शनिवारी १६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ वर पोहोचली आहे.

शनिवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू- ठाणे-१३६ (मुंबई १३६), नाशिक-१० (जळगाव १०), पुणे-६ (पुणे ५, सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ६, जालना १), लातूर-१ (बीड १).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.