ETV Bharat / state

Mumbai Most Expensive City: मुंबईतील घरभाड्यात १५ टक्क्यांनी वाढ, ठरले सर्वांत महागडे शहर

वाढत्या महागाईमुळे गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये घरभाड्यात 15 ते 20 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. त्या कारणाने शहरातील इतर खर्चातही वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे प्रवाशांसाठी तसेच स्थलांतरित लोकांसाठी मुंबई हे देशातील सर्वांत महागडे शहर असल्याचे मर्सरच्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग-२०२३' या अहवालात समोर आले आहे. या अहवालानुसार भारतातील प्रवाश्यांसाठी मुंबई हे सर्वांत महागडे शहर ठरले आहे.

author img

By

Published : Jun 10, 2023, 9:00 PM IST

Updated : Jun 10, 2023, 10:27 PM IST

Mumbai Most Expensive City
मुंबई
मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाची प्रतिक्रिया

मुंबई: सर्वेक्षण केलेल्या अहवालानुसार भारतीय शहरांमध्ये चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे येथे राहण्याचा खर्च मुंबईच्या तुलनेत ५० टक्क्यांहून कमी आहे. मुंबई पाठोपाठ नवी दिल्ली आणि बेंगळुरूचा क्रमांक लागतो. 'मर्सर'ने केलेल्या सर्व्हेनुसार जागतिक स्तरावर पाच खंडांमधील २२७ शहरांमध्ये मुंबई हे १४७ व्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर या यादीत हाँगकाँग आघाडीवर आहे. जागतिक क्रमवारीत दिल्ली हे १६९ व्या, चेन्नई हे १८४व्या, पाठोपाठ बेंगळुरू हे १८९व्या, हैदराबाद २०२व्या तसेच कोलकाता हे २११व्या तर पुणे २१३ व्या क्रमांकावर आहे. 'मेर्सर'ने केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील अंदाजित २०० पेक्षा जास्त वस्तू आणि सेवांच्या किमतींची तुलना केली आहे. ज्यामध्ये घर, अन्न, वाहतूक, घरगुती वस्तू, कपडे आणि मनोरंजन यांचा समावेश करण्यात आला.

कराची, इस्लामाबाद स्वस्त शहरे: 'मर्सर'च्या अहवालानुसार हाँगकाँग, सिंगापूर आणि झुरिच या वर्षी आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी जागतिक स्तरावर जगातील सर्वांत महागडी शहरे ठरली आहेत. यासोबत पाकिस्तानमधील कराची आणि इस्लामाबाद ही आणखी दोन शहरे सर्वांत स्वस्त ठरली आहेत. २०२३ मध्ये परदेशी नागरिकांसाठी आशिया मधील ३५ सर्वांत महागड्या शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश करण्यात आला आहे.

भाडेवाढीचे कारण काय? महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी सांगितले की, 'एमएमआर रिजन'मध्ये जवळपास १० हजार इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. यासोबत जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला सरकारने चालना देण्यासाठी दिलेल्या सवलतींमुळे मुंबईत अनेक प्रकल्प कार्यान्वित आहेत. यासोबत काही रखडलेले प्रकल्पही सुरू झाले आहेत. तसेच या इमारतींमधील रहिवासी नवीन ठिकाणी स्थलांतरित झाल्याने अशाप्रकारे भाडेकरूंच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. या कारणास्तव घरभाडे वाढणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे कोरोनामध्ये अनेकांनी घरून काम केले होते. ते आता संपल्यामुळे मुंबईत परतलेल्या नोकरदार व्यावसायिकांच्या घरांच्या मागणीमुळेही घरभाडे वाढले आहे.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्या: याबाबत बोलताना प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व्हेलेरीयन डायस यांनी सांगितले आहे की, घरांच्या भाड्याच्या किमती वाढण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आहेत. मग त्यामध्ये सिमेंट असेल स्टील असेल, त्याचबरोबर मजुरांचे पगार असतील. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बॅंकांचा 'इंटरेस्ट रेट' कारणीभूत: बँकांमधील 'इंटरेस्ट रेट'सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम घरभाडे वाढीवर झाला आहे. दुसरीकडे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने अनेकांचे आकर्षण मुंबईकडे असते. परंतु मुंबईतील बऱ्याच इंडस्ट्री, उद्योगधंदे मुंबई बाहेर गेले आहेत; परंतु मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये 'सर्विस इंडस्ट्रीज' असल्याने लोक आरामदायी जगण्यासाठी मुंबईकडे येत आहेत. त्या कारणानेसुद्धा त्याचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे.

Last Updated : Jun 10, 2023, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.