ETV Bharat / state

आज.. आत्ता... शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - शनिवारी

साताऱ्याच्या २ राजेंमधला वाद टोकाला, ते माझ्या वयाचे असते तर... उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा. दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळेन; मंत्रिमंडळ समावेशाबाबत विखेंचे सूचक वक्तव्य. धक्कादायक! ५०० कुटुंबांनी पैशांसाठी मुले ठेवली गहाण. दुर्दैवी ! आंबेगाव तालुक्यात घोडनदीत बुडून बहिण-भावाचा मृत्यू. 'रोहित शेट्टी पळपुटा'.. , ट्विटरवर मोहिम..अक्षय कुमार मात्र दिग्दर्शकाच्या पाठीशी ठाम.

आज.. आत्ता... शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : Jun 15, 2019, 7:05 PM IST

साताऱ्याच्या २ राजेंमधला वाद टोकाला, ते माझ्या वयाचे असते तर... उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा

मुंबई - काही केल्या उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रामराजे नाईक निंबाळकर हे वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. वाचा सविस्तर

दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळेन; मंत्रिमंडळ समावेशाबाबत विखेंचे सूचक वक्तव्य

अहमदनगर - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी आज शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईंचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केले. वाचा सविस्तर

धक्कादायक! ५०० कुटुंबांनी पैशांसाठी मुले ठेवली गहाण

नवी दिल्ली - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) एका मीडिया रिपोर्टच्या आधारे राजस्थान सरकारला नोटीस पाठवली आहे. राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात अनेक कुटुंबांनी स्वतःच्या मुलांना पैशांच्या बदल्यात गहाण ठेवल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या धक्कादायक प्रकाराविषयी आयोगाने ही नोटीस बजावली आहे. याला सरकारने ६ आठवड्यांत उत्तर द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे. वाचा सविस्तर

दुर्दैवी ! आंबेगाव तालुक्यात घोडनदीत बुडून बहिण-भावाचा मृत्यू

पुणे - आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी मृत बहीण-भावांची नावे आहे. दोघे विश्रांतवाडी पुणे येथे राहणारे होते. वाचा सविस्तर

'रोहित शेट्टी पळपुटा'.. , ट्विटरवर मोहिम..अक्षय कुमार मात्र दिग्दर्शकाच्या पाठीशी ठाम

मुंबई - दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सुर्यवंशी' सध्या चर्चेत आहे. अक्षय कुमार यात मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. या चित्रपटाचे रिलीज सलमान खानच्या 'इन्शाला'सोबत होणार होते. मात्र बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर टाळण्यासाठी रोहितने रिलीजची तारीख बदलली आहे. ही गोष्ट अक्षयच्या चाहत्यांना पटलेली नाही. रोहितला पळपुटा म्हणत त्याच्यावर तुफान टीका केली जात आहे. अक्षय कुमारने मात्र रोहित शेट्टीची पाठराखण केली आहे. वाचा सविस्तर

Intro:Body:

Rahul

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.