ETV Bharat / state

पावसाळ्यात घाटातील रेल्वे वाहतुकीवर 145 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार नजर

मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पावसाळ्यात रेल्वे गाड्या घाट विभागातून सुरळीत आणि विनाव्यत्यय धावाव्यात म्हणून रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची तयारी सुरू केली आहे. कर्जत लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाट विभागात विशेष भर देण्यात आले असून यंदाचा मान्सूनसाठी घाट मार्गावर 145 सीसीटीव्ही बसविण्याचे आणि घाटमाथ्यावरील 595 बोल्डर यशस्वीरित्या काढण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 13, 2022, 7:47 AM IST

मुंबई - मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पावसाळ्यात रेल्वे गाड्या घाट विभागातून सुरळीत आणि विनाव्यत्यय धावाव्यात म्हणून रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची तयारी सुरू केली आहे. कर्जत लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाट विभागात विशेष भर देण्यात आले असून यंदाचा मान्सूनसाठी घाट मार्गावर 145 सीसीटीव्ही बसविण्याचे आणि घाटमाथ्यावरील 595 बोल्डर यशस्वीरित्या काढण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.

रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिल्या सूचना - दक्षिण-पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा इगतपुरी विभागातील मान्सून पूर्व कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केली आहेत. यादरम्यान त्यांनी कल्याण लोणावळा घाट विभागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेणेकरून पावसाळ्यात रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावतील. त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लॅंडस्लाइडच्या घटनांमुळे असुरक्षित आहे ज्यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, ही तत्परता भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर केलेले उपाय वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करेल.

145 सीसीटीव्ही कॅमेरे - मध्य रेल्वेने दरवर्षी घाट विभागात जिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्या भागात एकूण 145 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. यापैकी 87 सीसीटीव्ही कॅमेरे दक्षिण पूर्व म्हणजे कर्जत लोणावळा विभागातील 19 असुरक्षित ठिकाणी तर 58 सीसीटीव्ही कॅमेरे ईशान्येकडील म्हणजे कसारा इगतपुरी विभागात 11 संवेदनशील ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. समर्पित आणि कार्यक्षम कर्मचार्‍यांच्या पथकाद्वारे या सीसीटीव्हीचे 24x7 निरीक्षण केले जाईल. हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

594 बोल्डर काढण्याचे काम सुरू - दोन्ही घाट विभागात घाटमाथ्यावरील 594 बोल्डरचे स्कॅनिंग करून काढण्याचे काम रेल्वेने हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जाळीच्या कामांबरोबरच लॅडस्लाइड होऊ नये. यासाठी खडकांचे अडथळे आणि टनेल पोर्टलची कामेही घाट विभागात हाती घेण्यात आली आहेत. मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत असून हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सतत अद्यतनांसाठी महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचारी यांच्याशी सतत देखरेख आणि संपर्क ठेवेल.

हेही वाचा - Railways for RRB examinees : आरआरबी परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेने सुरू केली विशेष गाडी; रेल्वे थांबणार विविध स्टेशनवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.