मुंबई : मुंबईमध्ये गेल्या २ महिन्यात गोवरच्या रुग्णांची (Measles Patients In Mumbai) संख्या वाढली आहे. आतापर्यंत मुंबईत गोवरचे ८ वॉर्डमध्ये १४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ७ संशयित मृत्यू (suspected measles patients deaths Mumbai ) आहेत. त्यापैकी कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २ आणि १ घरी मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. latest news from Mumbai, BMC On Measles Outbreak, number of measles patient death in Mumbai, Measles update Mumbai, Measles death In Mumbai
मुंबईमधील हे विभाग गोवरचे हॉटस्पॉट : मुंबईत गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत ८ विभागातील झोपडपट्ट्यात गोवरचे आतापर्यंत १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. लक्षणे दिसणा-या ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४ वॉर्ड कार्यालयापैकी ८ वॉर्डमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक रुग्ण गोवंडी एम ईस्ट विभागात आढळून आले आहेत. भायखळा ई विभाग येथे ५, गोवंडी शिवाजी नगर एम पूर्व येथे ४४, चेंबूर एम पश्चिम ६, कुर्ला एल येथे २९, मालाड पी नॉर्थ येथे १४, दादर धारावी जी नॉर्थ येथे १२, सांताक्रूझ खार पूर्व एच ईस्ट येथे ११, वडाळा माटुंगा एफ नॉर्थ येथे १२ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत ७ संशयित मृत्यू : २६ ऑक्टोबर पासून आतापर्यंत मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. हे सर्व संशयीत रुग्ण आहेत. त्यामधील कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
२० हजार मुलांच्या लसीकरणावर भर देणार : मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
बेड्सची संख्या वाढवणार : गोवरचे सर्वाधिक रुग्ण गोवंडीत आढळले आहेत. येथील रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय लांब पडत असल्याने तेथील शताब्दी रुग्णालयात १० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच या परिसरातील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
घरोघरी सर्वेक्षण व अतिरिक्त कॅम्प : मुंबईत गोवरचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागवार घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले जात असून लक्षणे आढळणा-या मुलांना रुग्णालयात दाखल केले जाते आहे. त्यासाठी अतिरिक्त आरोग्य कॅम्प आयोजित केले जात आहेत. लसीकरणावरही भर दिला जातो आहे. गोवरचे रुग्ण झोपडपट्टीतील असल्याने या भागात जनजागृती केली जाते आहे.