ETV Bharat / state

पहिली ते बारावीपर्यत शाळांना १४ दिवसांच्या दिवाळीच्या सुट्ट्या; शासनाने काढले परिपत्रक

कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू आहेत. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत.

14 days deewali vacation to 1st to 12th students maharashtra
पहिली ते बारावीपर्यत शाळांना १४ दिवसांच्या सुट्ट्या
author img

By

Published : Oct 27, 2021, 4:42 PM IST

Updated : Oct 27, 2021, 5:06 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने नुकत्याच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यावर सहामाही परीक्षा संपत आली असतानाच आता शासनाने दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यत आता दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे. याबाबत शासनाकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे. यामुळे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.

14 days deewali vacation to 1st to 12th students maharashtra
शासनाने काढलेले परिपत्रक

दिवाळीला १४ दिवस सुट्ट्या -

कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू आहेत. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत. मात्र, दिवाळी काही दिवसांवर आल्याने अजूनही दिवाळी सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. मात्र, आज शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, मुंबईतील शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक संभ्रमात पडले आहे. कारण उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना निरीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर, अशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अनेक शाळांनी ३० ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले आहे. त्या परीक्षांचे नियोजन आत कोलमडून पडणार आहे.

हेही वाचा - दिवाळीमध्ये पुण्यातील रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी

अशा असणार सुट्ट्या -

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ४ ऑक्टोबर २०२१पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहणार आहे.

शाळांच्या सुट्ट्यांबाबत पुन्हा गोंधळ -

शिक्षण निरीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर, अशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अनेक शाळांनी ३० ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले आहे. त्या परीक्षांचे नियोजन कोलमडून पडणार आहे. अनेक पालकांनी व शिक्षकांनी गावी जाण्याचे नियोजन केले असून रेल्वे व बसचे आरक्षण केले आहे. परवा याबाबत मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी सुट्टीबाबत आदेश काढले तसे शाळांनी नियोजन करून परीक्षांचे आयोजन व सुट्टीबाबत पालकांना कल्पना दिली. मग आज पुन्हा यामध्ये बदल करून गोंधळाची परिस्थिती का निर्माण केली? असा सवाल भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारला असून आधीच घोषित करण्यात आल्याप्रमाणे १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.

Last Updated : Oct 27, 2021, 5:06 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.