ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - government

गुरुवारी ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या

मंत्रालय
author img

By

Published : Feb 9, 2019, 3:08 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. गुरुवारी ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांची पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर भापकर यांच्या जागी क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त सुनील केंद्रेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता विवेक भीमनवार यांची बदली वर्धा जिल्हाधिकारीपदी, तर आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक डी. बी. देसाई यांची बदली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप यांची बदली मेडाचे महाव्यवस्थापक म्हणून झाली आहे, तर जी. बी. पाटील यांना मंत्रालयात कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागात नियुक्ती देण्यात आली.

बदली झालेले अधिकारी -

  • एच. मोडक - वाशिम जिल्हाधिकारी
  • शेलेश नवल - अमरावती जिल्हाधिकारी,
  • अविनाश ढाकणे - जळगाव जिल्हाधिकारी,
  • लक्ष्मीनारायण मिश्रा - पशुसंवर्धन आयुक्त
  • विनय गौडा जी. सी. - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदूरबार
  • आयुष प्रसाद - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला
  • जितेंद्र दुदी - नंदूरबार सहाय्यक जिल्हाधिकारी
undefined

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.