मुंबई : कॉपीमुक्त अभियान राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने सुरू केला आहे. मात्र, त्याचा फज्जा उडाल्याचा अनुभव शिक्षक मुख्याध्यापक, पालक वर्गांना येत आहे. मुंबईत दादर परिसरात नुकतीच बारावीच्या गणिताचा पेपर फुटीची घटना घडली आहे. केंद्र संचालकांच्या हि बाब लक्षात येतात, त्यांनी शनिवारी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परीक्षा मंडळाचे कॉफीमुक्त अभियान बाबत दावे फोल असल्याचे समोर येत आहे.
केंद्र संचालकांवर कारवाई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने कॉपीमुक्त अभियान सुरू करत आहोत; असे म्हणत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे गॅझेट नेण्याची परवानगी दिली नाही. त्याबाबत कस्तोडियन प्रमुख अर्थात केंद्र संचालक यांना देखील जबाबदार धरले जाईल, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे सक्त आदेश दिले होते.
शिक्षकच पुरवतात कॉपी : राज्यांमध्ये आतापर्यंत 16 ते 17 अशा कॉपी करण्याच्या घटना घडलेल्या आहे. ग्रामीण भागात प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे पालक किंवा संबंधित व्यक्ती त्यांना कॉपी पुरवण्यासाठी येतात. परंतु त्यांना त्याच्या आधी व्हाट्सअप मधूनच ही बाब माहिती होते. यामध्ये काही ठिकाणी शिक्षकच मदत करत असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तक्रारही दाखल झालेले आहेत. कोणते गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नसतानाही पेपर व्हाट्सअप मधून सार्वजनिक होतो, हेच अत्यंत धक्कादायक आहे.
पेपर फुटीच्या घटना : राज्याच्या किमान आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 17 ते 18 ठिकाणी या प्रकारच्या समाज माध्यमातुन बारावीच्या पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये मुंबई जिल्हा अद्याप राहिला होता. मात्र, आता त्याची भर पडलेली आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी व्हाट्सअपमध्ये तीन विद्यार्थ्यांकडून बारावीच्या गणिताच्या पेपर फुटीची घटना घडली. त्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या इतर पाच व्यक्तींना देखील त्याबाबत त्यांच्या कारवाई केली गेलेली आहे. केंद्र संचालक हे या पेपर फुटीच्या घटनेनंतर अत्यंत दूर राहत असल्यामुळे मुंबईतून शुक्रवारी सायंकाळी घरी रवाना झाले. परंतु वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शनिवारी सकाळी दादर येथील पोलीस स्थानकामध्ये त्यांनी पेपर फुटी संदर्भात तक्रार दाखल केली. तीन विद्यार्थी, त्यांना मदत करणारे इतर व्यक्ती होते. त्यांच्या बाबतचा गुन्हा नोंदवला असुन तपास सुरू केला आहे.
राज्य परीक्षा मंडळ अध्यक्ष खुलासा : या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने दूरध्वनी द्वारे संवाद साधला असता, त्यांनी याबाबत तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की," पेपर फुटी बाबतची बारावीच्या गणिताच्या विषयाची घडलेली घटना आमच्यापर्यंत पोहोचली. केंद्र संचालक यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी ताबडतोब इतर सहाय्यकांच्या मदतीने तीन विद्यार्थी, त्यांना मदत करणारे व्यक्ती यांच्याबाबत तक्रार दाखल करण्याचे ठरवले. परंतु केंद्र संचालक परीक्षा केंद्र पासून ते खूप लांब राहत असल्यामुळे शुक्रवारी ऐवजी शनिवारी सकाळी त्यांनी दादरच्या मुंबई पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली.
पेपर फुटीबाबत तपास : तसेच मुंबई विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव बोरसे यांच्या पुढाकारात ही सर्व बाब केली गेली असल्यामुळे ते देखील प्रशासनाच्या वतीने परीक्षा मंडळाच्या वतीने याबाबत तपास करीत आहे. याबाबत संबंधित डिसिलव्हा स्कुल, त्याच संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालया संदर्भातील सर्व पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासातून संपूर्ण माहिती अहवाल आल्यावरच त्या संदर्भातली पुढील माहिती सांगता येईल. परंतु परीक्षा मंडळ या सर्व प्रकारामुळे सजग झाले आहे. अधिक कडक पद्धतीने सोमवारपासून पेपर बाबत लक्ष ठेवले जाईल जेणेकरून कॉपीमुक्त अभियान सक्षमपणे पार पडेल.' यासंदर्भात पोलिसांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तपास कुठपर्यंत आलाय ती माहिती समजू शकलेली नाही.