ETV Bharat / state

HSC Result 2023 : विद्यार्थ्यांनो ऐकलं का! बारावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर; ‘या’ तारखेला लागणार Result - डिजिलॉकरवर बारावीचा निकाल

बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असते. या परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल कधी लागणार याची तारीख जाहीर झाली आहे. शिक्षण मंडळ 25 मे रोजी बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर करणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result
बारावी परीक्षेचा निकाल
author img

By

Published : May 24, 2023, 1:45 PM IST

Updated : May 24, 2023, 9:16 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 25 मे रोजी दुपारी 12 वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची धकधक वाढली आहे. इयत्ता दहावीचा निकालही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुपारी लागणार निकाल - बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागणार आहे. हा निकाल दुपारी 2 वाजेच्या दरम्यान संकतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांची धकधक वाढली आहे. तसेच पालकांनाही विद्यार्थ्यांच्या निकालाचे टेन्शन आले असणार हे नक्की.

येथे पाहता येणार निकाल : बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. या परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत दोन वेबसाईट mahresult.nic.in, www.mahahhscboard.in वर पाहता येणार आहे. विद्यार्थी वेबसाइटसह आपल्या मोबाईलवरही एसएमएसद्वारे पाहू शकतील. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 10 हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून साधरण 14 लाख 57 हजारह 293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर दहावीसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मोबाईलवर पाहा निकाल : SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्सवर जावे लागेल. तिथे 57766 या नंबरवर मेसेज करावा लागेल. मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकावा लागेल. नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुमचा निकाल मिळणार आहे.

ऑनलाईन निकाल : महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत वेबसाईट www.mahresult.nic.in वर जावून HSC result 2023 या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा सीट नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकतात.

हेही वाचा-

  1. Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'
  2. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक
  3. Vaibhavi Upadhyaya Dies : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात निधन

Last Updated : May 24, 2023, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.