मुंबई - मागील दहा वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिरात सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अखेर सिद्धिविनायक पावला आहे. सिद्धिविनायक मंदिर समितीने रोजंदारीवर काम करणाऱ्या 129 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले आहे.
याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. तो मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्यात आले. याध्ये सुरक्षा रक्षक आणि रोजंदारीवर काम करत असलेल्या 129 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे सडेतोड उत्तर
या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. सिद्धिविनायक मंदिर समिती अध्यक्ष आणि राज्यमंत्री आदेश बांदेकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.