मुंबई- मुंबईत रविवारी कोरोनाचे नवे 1242 रुग्ण आढळून आले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66507 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 3669 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 33491 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने, मुंबईत सध्या 29347 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत रविवारी नव्याने 1242 रुग्ण आढळून आले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू गेल्या 48 तासात झाले आहेत. 48 मृत्यूंपैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष आणि 15 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 28 जणांचे वय 60 वर्षावर तर 11 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईमधून आज 624 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 33491 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 ते 20 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.96 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 36 दिवसांवर पोहोचला आहे.