ETV Bharat / state

आज...आत्ता....गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - etv bharat

भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले. राष्ट्रवादीच्या भगीरथाने १४ वर्षात पाण्यासाठी अध्यादेश का काढला नाही - उदयनराजे. संतापजनक..! ५ लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल. त्याने फेसबुकला दाखवून दिली चूक; मिळाले ५ हजार डॉलर. साहोच्या या अभिनेत्रीने एअरपोर्टवर केले स्टंट, व्हिडिओ व्हायरल

आज...आत्ता....गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...
author img

By

Published : Jun 13, 2019, 6:11 PM IST

भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले

नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेच्या अपघातग्रस्त झालेल्या आयएएफ एएन-३२ विमानाजवळ आज सकाळी शोधपथक पोहोचले होते. मात्र, त्यावेळी अपघातग्रस्त विमानाजवळ त्यांना कोणाचाही मृतदेह सापडला नव्हता. परंतु, विमानात मृत झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मृतदेह अपघात परिसरात सापडले असल्याची माहिती वायुसेनेच्या पथकाने दिली आहे. यासोबतच, पथकाने ब्लॅक बॉक्सही शोधून काढला आहे. वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या भगीरथाने १४ वर्षात पाण्यासाठी अध्यादेश का काढला नाही - उदयनराजे

सातारा - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी स्वतःला भगीरथ म्हणून घेणाऱ्या व्यक्तींनी १४ वर्षात पाण्यासाठी अध्यादेश का काढला नाही. तुम्हाला देव माफ करणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

संतापजनक..! ५ लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड - माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

त्याने फेसबुकला दाखवून दिली चूक; मिळाले ५ हजार डॉलर

नवी दिल्ली - फेसबुकवर वारंवार पडिक असल्यामुळे घरच्या मंडळींचा ओरडा खावा लागणारी अनेकजण आहेत. मात्र, मणिपूरच्या जोनल सौगाईजाम या २२ वर्षीय तरुणाने फेसबुकला त्यांची एक चूक दाखवून देत लाखो रुपये मिळवले आहेत. वाचा सविस्तर

साहोच्या या अभिनेत्रीने एअरपोर्टवर केले स्टंट, व्हिडिओ व्हायरल

हैदराबाद - अभिनेता प्रभासच्या 'साहो' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतोय. १५ ऑगस्टला हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. 'साहो'मध्ये अभिनेत्री एवलिन शर्माची हिची महत्त्वाची भूमिका आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात ती एअरपोर्टवर स्टंट करताना ती दिसते. वाचा सविस्तर

Intro:Body:

rahul s

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.