ETV Bharat / state

तबलिगी मरकझ: मुंबईतील ११७ जणांना जीपीएसद्वारे पकडले; १० जणांचा अद्याप शोध सुरू - मुंबई बातमी

नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले शेकडो लोक महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात हे लोक सर्वत्र पसरले असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात या कार्यक्रमातून १२७ जण आले आहेत. त्यापैकी १०५ जणांना गुरुवारी पकडण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली होती. त्यात आणखी वाढ झाली आहे.

117-persons-trace-by-gps-in-mumbai-but-10-more-missing-from-tabligi-markaz
मुंबईतील ११७ जणांना जीपीएसद्वारे पकडले
author img

By

Published : Apr 3, 2020, 5:23 PM IST

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या कार्यक्रमातून मुंबईत आलेल्या ११७ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर १० जणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा- नेपाळमधील तबलिगी जमातीच्या १४ जणांना संमनेरमध्ये दिला आसरा; 5 जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले शेकडो लोक महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात हे लोक सर्वत्र पसरले असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात या कार्यक्रमातून १२७ जण आले आहेत. त्यापैकी १०५ जणांना गुरुवारी पकडण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली होती. त्यात आणखी वाढ झाली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी तब्बल ११७ जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना जीपीएसचा वापर करुन पकडण्यात आले आहे. इतर १० जणांनी आपले मोबाईल बंद ठेवल्याने त्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. ताब्यात घेतलेले सर्वजण मुंबईमधील धार्मिक वास्तूमध्ये लपून बसलेले होते. सर्वांना मुंबईमधील विविध ठिकाणी होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभाग आणि पोलीस लक्ष ठेवून आहेत.

जे १० जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम पालिका आणि पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई सध्या रुग्णांची रोजच वाढ होत असल्याने रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.