मुंबई : अंंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 27 वर्षांच्या आफ्रिकन आरोपीकडून ५६ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले होते. या अंमली पदार्थाची किंमत 99 लाख होती. तर 37 वर्षे आरोपीकडून ६० ग्रॅम 'एम.डी.' जप्त करण्यात आले. याची किंमत 92 लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण 1 कोटी 91 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
संशयावरून अटक केली अन् : वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, मुंबईच्या पथकाने पूर्व प्रादेशिक विभागामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा 21 जानेवारीला गस्तीदरम्यान शोध घेण्यात आला होता. यावेळी डंपिंग वॉल कंपाउन्ड जवळ, बैंगनवाडी, गोवंडी या ठिकाणी २७ वर्षे वयाच्या एक संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे ५६ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याच्याविरुद्ध कलम ८ (क) सह २२ (क) एन. डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
ड्रग तस्करांवर यापूर्वीही कारवाई : मुंबई शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी वरळी युनिटने 11 जानेवारी, 2023 रोजी धारावी परिसरातून तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. या तीन तस्करांकडून १४० ग्रॅम मेफेड्रीन (एमडी) हे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्याची किंमत २८ लाख रुपये इतकी होती. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
वरळी युनिटने केली कारवाई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने केलेल्या या कारवाई प्रकारणी एनडीपीएस कायदा १९८५ कलम- ८ (क) सह २२ (ब), २२ (क), २९ अन्वये गुन्हा ( Anti Narcotics Sell Seize 28 Lakh Rupees MD ) दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी रात्री ९. ४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. तिन्ही आरोपींकडून १४० ग्रॅम एमडी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा : BMC Budget 2023 : मुंबईकरांच्या आरोग्यावर विशेष लक्ष, 'आरोग्यम् कुटुंबम' कार्यक्रम राबवला जाणार