मुंबई - राज्यात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, आपले कर्तव्य बजावणाऱ्या 103 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
महाराष्ट्र पोलीस दलात आत्तापर्यंत 9 हजार 566 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 988 पोलीस अधिकारी तर 8 हजार 578 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1 हजार 929 बाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. यात 224 पोलीस अधिकारी तर 1 हजार 705 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 हजार 534 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये 755 पोलीस अधिकारी तर 6 हजार 789 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 103 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 9 पोलीस अधिकारी व 94 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 19 हजार 975 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यभरात 324 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 883 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अनधिकृतपणे वाहतूक प्रकरणी 32 हजार 467 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 9 हजार 4257 वाहने जप्त केली असून तब्बल 18 कोटी 24 लाख 46 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 65 घटना घडल्या आहेत .
राज्यात कोरोनामुळे 103 पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमी विविध नियम लावण्यात आले आहेत. याची अंमलबजाणी व्यवस्थित होते की नाही याकडे पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असते. यादरम्यान राज्यात 9 हजार 566 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 103 पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.