मुंबई - शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे तसेच ऐतिहासिक स्थळं आहेत. त्यापैकीच मुंबईतील वरळीत 100 वर्षांपेक्षा अधिक जुने जपानी बुद्ध विहार आहे. जपानी बौद्ध भिख्खू निचीदात्सू फुजी यांनी 1930 साली हे विहार बांधले. ते महात्मा गांधींचे मित्र होते. गांधीजींच्या अहिंसावादी स्वातंत्र्य लढ्यात फुजी यांचा सहभाग होता.
ही जागा 1956 साली बिर्ला यांच्या ताब्यात गेली. मुळातल्या मठाच्या जागी त्यांनी विहाराची उभारणी केली. आज आपण जे विहार पाहतो ते 1956 सालचे आहे. या बौद्ध विहाराचे नाव आहे ‘निप्पोन्झान मायोहोजी बौद्ध विहार', असे आहे.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी
विहारात दररोज सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी साडेपाचे ते 7 च्या दरम्यान प्रार्थना केली जाते. बाहेरच्या धावत्या जगातून 'ब्रेक' घ्यायचा असेल तर हे मंदिर अगदी योग्य आहे. विहाराच्या आत आल्यानंतर तुम्हाला हे लगेच जाणवेल. विहार अगदी साध्या धाटणीचे आणि स्वच्छ आहे. भिंतीवर बुद्धाचे चरित्र दर्शवणारी चित्रं लावण्यात आलेली आहेत. प्रार्थनेच्यावेळी वापरण्यात येणारे ड्रम्सही तुम्ही पाहू शकता.
हेही वाचा - रेस कोर्सजवळ पाईपलाईन फुटली; मुंबई सेंट्रल परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुंबई हे वर्दळीचे ठिकाण आहे, धावपळीच्या आयुष्यात शांतता शोधायची असेल तर हे मंदिर योग्य ठरेल. जपानमध्ये असणाऱ्या बौद्ध विहारासारखे शांत क्षण जर जपानमध्ये न जाता अनुभवायचे असतील तर मंदिराला नक्कीच भेट द्या.