ETV Bharat / state

सचिन वाझेने 'याज साठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला'; प्रकरण अंगलोट आल्याने मनसुखची हत्या - सचिन वाझे विरुद्ध 10 हजार पानांचे आरोप पत्र दाखल

'अँटीलिया'समोर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सीबीआयने 10 हजार पानांचे आरोप पत्र दाखल केलं आहे. 'सचिन वाझेनेच स्कॉर्पिओ ठेवली होती. त्याला पुन्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नाव कमवायचे होते. यासाठी त्याने मनसुख यांची गाडी वापरली. प्रकरण अंगाशी आल्यावर मनसुख यांना आरोप स्वतःवर घ्यायला सांगितले. मात्र मनसुख यांनी अंगाला चिटकून न घेतल्याने त्यांच्या हत्येचा कट रचला. इतर आरोपींना सोबत घेऊन मनसुख यांना संपवण्यात आलं', असं या आरोप पत्रात म्हटलंय. वाचा सविस्तर...

Sachin Waze
Sachin Waze
author img

By

Published : Sep 4, 2021, 1:23 PM IST

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवस्थान असलेल्या 'अँटीलिया'समोर स्फोटके भरलेली स्कार्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणी सीबीआयच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात १० हजार पानांचं आरोप पत्र दाखल करण्यात आलं. या आरोप पत्रात प्रामुख्याने या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उत्तम तपास अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असल्याचं सिध्द करण्यासाठी अँटीलियासमोर स्फोटकांनी भरलेली स्कर्पिओ गाडी ठेवल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

10 हजार पानांच्या आरोप पत्रात स्कॉर्पिओ ठेवल्याचे कारण

त्याचप्रमाणे स्कार्पिओ गाडी चोरी गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिसरा गुन्हा या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह घोडबंदर येथे मिळाल्याने दाखल करण्यात आला. सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या ९ हजारांच्यावर पानांच्या आरोप पत्रात सचिन वाझेने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? याचं कारण देण्यात आलं आहे.

वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं

ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं. मात्र, 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं. इतकंच नाही तर क्राईम इन्वेस्टिगेशन यूनिट (सीआययु) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं. सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र, पंधरा वर्षानंतर मुंबई पोलीस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती. म्हणून त्याने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचे एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.

सचिन वाझेचा नाट्यक्रम

24 फेब्रुवारीच्या रात्री अँटीलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. ही स्कॉर्पिओ सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन यांचीच होती. सचिन वाझेने मनसुख यांना गाडी हरवल्याची तक्रार नोंदवण्यास सांगितलं होतं. मात्र, ती स्कॉर्पिओ सचिन वाझेकडेच होती. इतकंच नाही तर या प्रकरणाचं गांभीर्य वाढवण्यासाठी ही गाडी दहशतवादी संघटना “जैश उल हिंद”कडून ठेवण्यात आल्याचा बनावसुद्धा सचिन वाझेने केला होता. सगळ्यात आधी गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंतर क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आणि या गुन्ह्याचा तपास अधिकारी सचिन वाझे झाला.

मनसुख हाताबाहेर गेल्याने रचला त्याच्या हत्येचा कट

प्रकरण इतकं चिघळेल याची पूर्व कल्पना सचिन वाझेने केली नव्हती. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण हाताबाहेर जाताना सचिन वाझेला दिसलं, तेव्हा त्याने मनसुख हिरेन यांना सर्व आरोप स्वतःवर घेण्यास दबाव आणला. मात्र, मनसुख यांनी जेव्हा हे आरोप स्वतःवर घेण्यास नकार दिला, तेव्हा सचिन वाझेने मनसुख यांची हत्या करण्याचा प्लॅन आखला. या प्लॅनमध्ये त्याने सुनील माने आणि प्रदीप शर्माला आपल्यासोबत घेतले आणि यांच्यासोबत मिळून त्यांनी मनसुख यांच्या हत्येचा कट रचला.

इतर आरोपींकडून मनसूखची हत्या

प्रकरण शांत होईपर्यंत मनसुख हिरेन यांना अंडरग्राउंड होण्याचा सल्ला सचिन वाझेने दिला. मात्र, या मागचा मुख्य उद्देश मनसुख यांची हत्या करणं होता. सुनील माने याने मनसुख यांना आपल्या गाडीत बसवलं. नंतर मनसुख यांना इतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोटखुरी, मनीष सोनी यांच्या हवाली केलं. ज्यांनी नंतर मनसुख यांची हत्या केली आणि ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह टाकून दिला. जो नंतर सापडला.

वाझेने वापरले नवीन मोबाईल, सिम

हा गुन्हा करण्यासाठी आरोपी सचिन वाझने नवीन मोबाईल फोन, सिम कार्ड वापरले होते. जे देण्यासाठी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनी मदत केली होती. सचिन वाझेने त्याचा सहकारी रियाजुद्दीन काजीलासुद्धा सोबत घेतलं आणि तपासात जे पुरावे हाती लागले ते सर्व नष्ट करण्यास सांगितलं. या प्रकरणात 9 पेक्षा अधिक आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -अनिल देशमुख यांच्या वकीलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आज न्यायालयात केले जाणार हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.