ETV Bharat / state

Measles Outbreak : मुंबईत आज गोवरचे १० नावे रुग्ण, आतापर्यंत ४९७९ संशयित रुग्णांची नोंद

मुंबईत आज गोवरचे निश्चित निदान झालेले १० रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत निश्चित निदान झालेल्या एकूण ४७२ रुग्णांची तर ५०१७ संशयित रुग्णांची नोंद ( Measles patients in Mumbai ) झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे.

Measles Outbreak
Measles Outbreak
author img

By

Published : Dec 14, 2022, 10:24 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची ( Measles patients Mumbai ) संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत ८३ लाख ७७ हजार २१४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५०१७ संशयित रुग्ण आढळून आले ( Measles patients in Mumbai ) आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४७२ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत गोवरमुळे १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे.

१५ रुग्ण ऑक्सीजनवर, २ व्हेंटिलेटरवर : मुंबईत ८३ लाख ७७ हजार २१४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५०१७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४७२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३६ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ११७ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १७२ जनरल बेडपैकी ९८, १२९ ऑक्सीजन बेड पैकी १५, ३५ आयसीयु बेडपैकी ४ बेडवर रुग्ण आहेत. १८ व्हेंटिलेटर असून त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

मुलांचे लसीकरण : आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २४ हजार ७५२ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ३५ हजार ८७८ मुलांपैकी ४१,२०९ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी १२२७ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.

मुंबईतील १३ तर बाहेरील ३ मृत्यू : मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १६ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १३ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ५ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

या उपाययोजना : गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुले असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.