ETV Bharat / state

पावसाचा रेल्वेसेवेला फटका; मुंबई-अहमदाबाद, शताब्दीसह १० एक्सप्रेस रद्द, लोकलवरही परिणाम

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच ६२ लोकल गाडांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेसेवेला पावसाचा तडाखा
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:47 PM IST

मुंबई - आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मुंबई-अहमदाबाद, शताब्दी यासह १० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले.

तसेच एसी लोकलच्या २ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एसी लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. एकूणच पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण ६२ लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पालघरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे सकाळी ६ वाजेपासून तेथील रेल्वेट्रॅक बंद होता. सकाळी ८ नंतर ट्रॅकवरील पाण्याचा निचरा झाल्यानंतर पुन्हा रेल्वेलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या पालघर परिसरातील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. मरिन लाईन्स येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने २ तास पश्चिम रेल्वेवरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होत्या.

पावसाळ्यापूर्वी पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचू नये यासाठी योग्य काळजी घेण्यात आली आहे. तसेच ६ रेल्वे स्थानकावर रेन गेज लावल्याने किती पाऊस झाला? याची नोंद करता येते.

Intro:मुंबई - सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही जाणवला आहे.पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मुंबई अहमदाबाद, शताब्दी या 10 एक्सप्रेस गाड्या आजच्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या. तर 15 गाड्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. एसी लोकलच्या 2 फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यानंतर एसी लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. एकूणच पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील 62 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. Body: पालघरला सर्वांत जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे 6 वाजता तेथील ट्रक बंद होता. सकाळी 8 नंतर ट्रकवरील पाण्याचा निचरा झाल्यानंतर पुन्हा रेल्वेलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या पालघरकडील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. मरिन लाईन्स येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने 2 तास पश्चिम रेल्वेवरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू होत्या. Conclusion:पावसाळ्यापूर्वी पश्चिम रेल्वेच्या ट्रकवर पाणी साचू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे.
रेन गेज 6 स्टेशनवर लावले असल्याने किती पाऊस होईल याची माहिती मिळते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.