मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने आगरीपाडा परिसरामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान दीड कोटी रुपयांचे अर्धा किलो कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी चिकूएमेका इमॅन्युअल एनवानको या 35 वर्षे परदेशी अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. ही कारवाई 23 मार्च रोजी करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेतल्यास सरकारची नाचक्की होईल; काँग्रेस दोलायमान स्थितीत
कापड विक्रीच्या नावाखाली अमली पदार्थांची तस्करी
मुंबई शहरात कपडे विक्रीच्या नावाखाली आलेला चिकूएमेका इमॅन्युअल एनवानको हा आरोपी नवी मुंबईतील जुईनगर येथे वास्तव्यास होता. मूळचा नायजेरियन नागरिकत्व असलेला हा अमली पदार्थ तस्कर गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-मुंबई परिसरामध्ये कोकेनसारख्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटला मिळाली होती. त्यानुसार आगरीपाडा म्युनिसिपल शाळेच्या मैदानात सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीच्या झडतीमध्ये तब्बल 500 ग्रॅम कोकेन आढळून आले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 1कोटी 50 लाख रुपये एवढे असल्याचे समोर आले आहे.