ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

गावातीलच एका मुलीबरोबर सुधीर कांबळे याचे प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या नातेवाईकांचा याला विरोध होता. शिवाय मुलीच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याने सुधीरने गावातीलच वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

youth commits suicide over love affair in latur
प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
author img

By

Published : Nov 14, 2020, 5:33 PM IST

लातूर - औसा तालुक्यातील कार्ला येथील 20 वर्षीय तरुणाने गावातीलच वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाने हे पाऊल उचलले असून हा घातपात असल्याचा आरोप आता मुलाचे नातेवाईक करीत आहेत. यासंबंधी किल्लारी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

औसा तालुक्यातील कार्ला येथे राजाबाई गौतम कांबळे व त्यांचा 20 वर्षीय मुलगा वास्तव्यास होते. परंतु घरची परस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी पुणे शहर जवळ केले होते. मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि हातचे कामही गेले. त्यामुळे पुन्हा मूळ गावी येणे पसंत केले. मात्र, गावातीलच एका मुलीसोबत सुधीर याचे प्रेमसंबंध होते. पुन्हा गावात सुधीर परतल्याने त्यांचे सूत जुळले. पण या दोघांच्या प्रेमाला मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होता. मध्यंतरी यावरून सुधीरला मारहाणही झाली होती. शिवाय मुलीचे नातेवाईक आता तिच्या लग्नाची तयारी करीत होते. प्रेमात मुलीच्या नातेवाईकांचा अडसर होत होता. ही गोष्ट सुधीरला खटकत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, मध्यरात्री सुधीरला कोणाचा तरी फोन आला आणि तो बोलत घराबाहेर पडला तो परतलाच नाही. सकाळी वडाच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. यावरून किल्लारी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पण मयत सुधीरचे नातेवाईक आता हा घातपात झाल्याचा आरोप करीत आहे. घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

10 वी पासून होते प्रेमसंबंध-

10 वी पासूनच कार्ला गावातीलच मुलीबरोबर सुधीरचे प्रेमसंबंध होते. मध्यंतरी त्याच्या कुटुंबीयांनी गाव सोडले असल्याने त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, पण संपर्क कायम होता. अशातच लॉकडाऊनमुळे सुधीर गावाकडे परतला आणि पुन्हा हे प्रकरण सुरू झाले पण नातेवाईकांचा होत असलेला विरोध पाहून त्याने हे पाऊल उचलले.

हेही वाचा- आम्हालाही तुमची थडगी उकरून काढता येतील, तेव्हा रक्तबंबाळ व्हाल - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.