लातूर - एका 60 वर्षीय महिलेवर कामावरून घरी परतत असताना तरुणाने अत्याचार केल्याची घटना अहमदपूरमध्ये घडली आहे. या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या महिलेला आरोपीने दिली होती. मात्र या सर्व प्रकारामुळे व्यथित झालेल्या महिलेने शहराजवळ असलेल्या वाकी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
सोमवारी रात्री पीडित महिला कामावरून घराकडे निघाली होती. दरम्यान आरोपी किशन उगाडे वय 30 वर्ष याने या महिलेवर अत्याचार केला. या घटनेबाबत कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली होती. महिलेने घरी आल्यावर तिच्या सुनेला हा प्रकार सांगितला. मात्र या घटनेनंतर अस्वस्थ झाल्याने तीने शहराजवळ असलेल्या वाकी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी महिलेच्या सुनेने आरोपीविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.