लातूर - राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या राज्य कृषी प्रदर्शनाचा समारोप पार पडणार आहे. यावेळी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले असून आता ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहेत. मात्र, हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर ते आता लातुरात काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
मनसेचे हे दुसरे राज्य कृषी प्रदर्शन आहे. गेल्या 4 दिवसांपासून या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसंबंधी विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास राज ठाकरे हे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आता समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.
हेही वाचा - कुलगुरू अन् विद्यार्थ्यांची चर्चा फिसकटली; ठिय्या आंदोलन सुरूच
दरम्यान, कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे लातुरात आले असले तरी, त्यांनी घेतलेली हिंदूत्वाची भूमिका यावर ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.