लातूर - विधानसभेच्या मतदान प्रक्रियेस प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी सातच्या दरम्यान मतदानाला सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आजही पहाटेपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी प्रमाणात आढळून येत आहे.
हेही वाचा- देव तारी त्याला.. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला जिवंत, पाहा व्हिडिओ
जिल्ह्यात 2013 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 19 लाख 15 हजार मतदारांची संख्या आहे. सकाळी 7 च्या दरम्यान मतदानाला सुरवात झाली. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसाची हजेरी यामुळे कुठेतरी मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पावसाचा जोर आणि केंद्रावरील गर्दी वाढण्यापूर्वी येथील एका आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला. पावसामुळे मतदान केंद्रवर सध्या तरी गर्दी पाहवयास मिळत नाही. मात्र, 700 मीटरवरच मतदान केंद्र असून मतदारांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बाजावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.