ETV Bharat / state

ईदगाह मैदानात हलविले भाजीमंडई, विक्रीला 'सोशल डिस्टन्सींग'सह 4 तासांची परवानगी - ईदगाह मैदान

शहरातील भाजीमंडईत जास्त गर्दी होत असल्याने ही भाजीमंडई आता ईदगाह मैदानात हलविण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर भरणाऱ्या मंडईमध्ये दोन भाजीविक्रेत्यांच्या दरम्यान किमान पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच भाजीविक्रत्यांना ग्राहकांमध्ये किमान तीन फुटांचा अंतर ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. ही मंडई सकाळ 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

ईदगाह मैदानावरील भाजी मंडई
ईदगाह मैदानावरील भाजी मंडई
author img

By

Published : Mar 30, 2020, 12:05 PM IST

लातूर - जिल्ह्यात आतापर्यंत 59 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी 'सोशल डिस्टन्स'च्या नियमांचे पालन केले जात आहे. येथील ईदगाह मैदानात भाजीमंडई हलविण्यात आली असून प्रत्येक विक्रेत्यांमध्ये ५ फुटापर्यंतचे अंतर ठेवण्यात आले आहे. शिवाय सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतच भाजीमंडई सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रधासनाने दिली आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

आता कुठे लातूरकरांकडून नियमांचे पालन होताना पाहवयास मिळत आहे. शहरातील रस्ते निर्मनुष्य असले तरी सकाळी आणि सायंकाळी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. त्यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गर्दीच्या ठिकाणांसाठी पर्यायी व्यवस्था करून दिली आहे. रस्त्यावरील फळगाडे थेट बसस्थानकात हलविण्यात आले आहेत तर किराणा दुकानदारांना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन होताना पहावयास मिळत आहे. दुसरीकडे पाण्याच्या टाकीजवळील भाजीमंडईत होत असलेली गर्दी टाळण्यासाठी ही भाजीमंडई दयानंद महाविद्यालयात हलविण्यात आली होती. मात्र, अपुरी जागा आणि होणारी गर्दी यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजीमंडई लगतच्या ईदगाह मैदानात सुरू आहे. प्रत्येक भाजी विक्रेत्यांमध्ये 5 फुटाचे अंतर ठेवायला सांगितले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे पालन आता पालन करत आहेत.

शहरप्रमाणेच ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सची यंत्रणा राबविणे गरजेचे झाले आहे. कारण, संचारबंदीच्या सुरवातीच्या काळात ग्रामीण भागात सर्व नियमांचे पालन केले जात होते. मात्र, काळाच्या ओघात या नियमांचा विसर ग्रामस्थांना पडत नाही आहे. तर ग्रामसेवक, तलाठी, कृषी मंडळ अधिकारी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही.

हेही वाचा - कोरोना ईफेक्ट : भटक्या विमुक्त संघटनेकडून गरीब लोकांना अन्नधान्याचे वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.