ETV Bharat / state

तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, लातूरमधील घटना

उदगीर तालुक्यातील हनमंतवाडी परिसरात असलेल्या पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. इंद्रजीत अंचेश्वर माचोळे, गोविंद बोयणे असे मृतांची नावे आहेत.

two small children drown to death in Udgir latur
तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, लातूरमधील घटना
author img

By

Published : Jul 4, 2020, 4:37 AM IST

लातूर - गावालगत असलेल्या पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. उदगीर तालुक्यातील हनमंतवाडी येथील शिवारात ही घटना घडली आहे.

तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू...

सविस्तर माहिती अशी, हणमंतवाडी गावाला लागून असलेल्या पाझर तलावात गावची मुलं पोहायला जात होती. सध्या होत असलेल्या पावसामुळे या तलावात पाणीही साठले आहे. शिवाय तलावातील गाळ काढल्याने जागोजागी खड्डे पडले होते. यातच गावचे इंद्रजीत अंचेश्वर माचोळे (वय. 12), गोविंद बोयणे ( वय. 12) व नागेश बळीराम माचोळे हे पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना या मधील दोघे जण गाळात अडकले तर नागेश माचोळे कसाबसा बाहेर आला. मात्र, त्याला दोन्ही मित्र दिसेनासे झाले. त्याने लागलीच गावाकडे धाव घेऊन याबाबत सांगितले.

अवघ्या काही वेळातच ग्रामस्थ तलावाजवळ दाखल झाले. इंद्रजीत आणि गोविंद यांचा शोध सुरू केला आणि काही वेळात त्यांनाही बाहेर काढण्यात आले. देवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करीत असतानाच इंद्रजीत याचा मृत्यू झाला. तर गोविंद याला पुढील उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयाकडे मार्गस्थ करण्यात आले. मात्र, त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - लातूरकरांना दिलासा : मांजरा धरणात 5 दलघमीने पाणीसाठा वाढला

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: कोरोनाबाबत खासगी रुग्णालयात 'अशी' घेतली जातेय खबरदारी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.