ETV Bharat / state

निलंग्यात एकाच दिवशी दोघांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ

शनिवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लातूर
author img

By

Published : Nov 9, 2019, 11:48 PM IST

लातूर - निलंगा शहराच्या आनंदमुनी चौकातील भाजी मंडई येथे अशोक ग्यानबा कोरके (वय ३५ रा.मारवाड गल्ली) यांचा तर शहरापासून जवळच असलेल्या दापका गावातील एका कठड्याच्या कडेला शरीराने अपंग असलेले गंगाभीषण अमृतराव भोपी यांचा मृतदेह आढळून आला. शनिवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत निलंगा पोलिसांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले दिनांक ९ नोव्हेंबरला सकाळी शहरातील आनंदमुनी चौक आणि दापका येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा करून निलंगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दोघाही मयत व्यक्तीचे शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत बनसोडे करत आहेत. या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Intro:निलंग्यात दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे दोघांच्याही प्रेताचे शेवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. Body:निलंग्यात दोघांचा वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना घडली आहे.

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा शहरातील आनंदमुनी चौकातील भाजी मंडई येथे अशोक ग्यानबा कोरके वय ३५ वर्षे रा.मारवाड गल्ली यांचा तर शहरापासून जवळच असलेल्या दापका गावातील एका कठड्याच्या कडेला शरीराने अपंग असलेले गंगाभीषण अमृतराव भोपी यांचा मृतदेह अढळून आला आहे.एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत निलंगा पोलिसांना संपर्क साधला असता ते म्हणाले दिनांक ९ रोजी सकाळी शहरातील आनंदमुनी चौक वा दापका येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली त्यानुसार घटनास्थळी जाऊन सदरील घटनेचा पंचनामा करून निलंगा शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दोघाही मयत व्यक्तीचे शेवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुढील तपास पो.उ.नि.बनसोडे श्रीमंत करत आहेतConclusion:याबाबत निलंगा पोलिस ठाण्याचे पो.उ.नि.श्रीमंत बनसोडे पुढील तपास करात आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.