ETV Bharat / state

लातूर-बार्शी महामार्गावर ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ट्रक चालक ठार - sugar factory

लातूर-बार्शी रोडवरील मांजरा कारखान्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत विश्वनाथ माने (वय ५७ अपचुदा ता. औसा ) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

accident
author img

By

Published : Feb 2, 2019, 2:57 PM IST

लातूर - बार्शी रोडवरील मांजरा कारखान्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत विश्वनाथ माने (वय ५७ अपचुदा ता. औसा ) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

ट्रक चालक माने कांद्याने भरलेला ट्रक घेऊन लातूरकडे निघाले होते. त्यांचा ट्रक मांजरा साखर कारखाना परिसरात आला असता समोरून येणाऱ्या वेगवान ट्रॅक्टरची (एम.एच.१३ ए.जे. ३९३६) समोरा-समोर धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक्टर पलटी झाला असून ट्रकची एक बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालक माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:FTP : mh_latur_truck-tractor accident visual01
mh_latur_truck-tractor accident visual02
mh_latur_truck-tractor accident visual03
ट्रक - ट्रक्टरचा भीषण अपघात ; ट्रक चालकाचा मृत्यू
लातूर - लातूर - बार्शी रोडवरील मांजरा कारखान्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ट्रक - ट्रक्टर यांचा
समोरासमोर भिषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.Body:भरत विश्वनाथ माने (वय ५७)असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून मूळचे अपचुदा ता. औसा येथील रहिवासी होते. कांद्याने भरलेली ट्रक घेऊन माने हे लातूरकडे निघाले होते. तर सुसाट वेगात समोरून ट्रक्टर (एम.एच.१३ ए.जे. ३९३६) हा आल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. हा अपघात एवढा भिषण होता की ट्रक्टरची पलटी झाली असून ट्रक एक बाजू पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. लातूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.Conclusion:यासंबंधी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.