ETV Bharat / state

पालकमंत्र्यांचे 'वर्चस्व' कायम राहणार, की अमित देशमुख 'हात' दाखवणार; लातुरकरांची उत्सुकता शिगेला

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचे 'वर्चस्व' कायम राहणार की आमदार अमित देशमुख 'हात' दाखवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर
author img

By

Published : Apr 19, 2019, 2:55 AM IST

लातूर - लोकसभा मतदार संघामध्ये ६५ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा वाढता टक्का आणि वंचित बहुजन आघाडीचे आव्हान या दोन्हीही बाबी मतदानाच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचे 'वर्चस्व' कायम राहणार की आमदार अमित देशमुख 'हात' दाखवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून मतदार संघात पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या सभा, प्रचार यंत्रणा राबवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर काँग्रेसकडून सभांवर भर न देता प्रत्यक्ष मतदारांच्या भेटींना महत्व दिले जात होते. हा मतदार संघ राखीव असला तरी येथे २ मराठा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच यंदा वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत उडी घेतल्याने याचा फटका कुणाला बसणार आणि लाभ कुणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.

मतदानाची तयारी करताना कर्मचारी

सुरुवातीच्या काळात प्रचार यंत्रणेत आघाडीवर असणाऱ्या काँग्रेसने शेवटच्या काही दिवस मतदारांच्या भेटीवर भर दिल्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फटका ज्या पक्ष्याच्या उमेदवाराला बसेल त्याचा पराभव अटळ असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत लातूरकर कोणाला आपला कौल देणार हे २३ मेलाच स्पष्ट होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.