ETV Bharat / state

आंबेगावात अज्ञात चोरट्यांनी पळवली लाखांची बैलजोडी, निलंगा पोलिसात गुन्हा दाखल - pair of bullock

निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात बांधलेली लाख रुपयांची बैलजोडी टेम्पोमधून पळवली. याप्रकरणी याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलजोडी चोरली
बैलजोडी चोरली
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:33 AM IST

लातूर - निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतात गोठ्यात बांधलेली १ लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी प्रमोद मरूरे यांची मसलगा डॅमच्या शेजारी शेती आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात १ लाख रुपये किमतीची बैलजोडी व इतर जनावरे बांधून ठेवली होती. 'रात्री ते जेवण करण्यासाठी घरी गेले असता ९.३० च्या दरम्यान अज्ञात चोरांनी विना नंबरचा टेम्पो शेतात आणून गोठ्यात बांधलेली बैलजोडी त्यात घालून पोबारा केला. या टेम्पोमागे जय महाराष्ट्र लिहिले होते,' अशी फिर्याद निलंगा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

हेही वाचा - जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने नैराश्य; लातुरात 23 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जनावरे चोरून शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात नेऊन विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत, परंतु याचा तपास कधीही लागला नाही. याबाबत शेतकरी प्रमोद मरूरे यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - बोरसुरी अवैध दारू विक्री प्रकरण; सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांची बदली

Intro:अज्ञात चोरांनी बैलजोडी चोरली निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल Body:आंबेगावात आज्ञात चोरांनी लाखाची बैलजोडी चोरली
निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथिल शेतकरी प्रमोद दासराव मरूरे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली लाखा रूपये किमतीची बैल जोडी दिनांक ७ रोजी राञी ९.३० वाजता अज्ञात चोरांनी टेम्पो मध्ये घालून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली आहे.यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित शेतकरी प्रमोद मरूरे यांची मसलगा डॕमच्या शेजारी शेती आहे शेतातील गोठ्यात एक लाख रूपये किमतीची बैलजोडी व इतर जनावरे बांधून ते जेवन करण्यासाठी घरी गेले असता राञी ९.३० च्या दरम्यान अज्ञात चोरांनी विना नंबरचा टेम्पो शेतात आणून सदरील दोन बोल घेऊन गेले आहे व सदरील टेम्पोवर पाठीमागे जय महाराष्ट्र असे लिहलेले होते अशी फिर्याद निलंगा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.जनावरे चोरून शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात नेऊन विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत परंतु याचा तपास कधीही लागला नाहीConclusion:याबाबत शेतकरी प्रमोद मरूरे यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निलंगा पोलिस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.