ETV Bharat / state

लातुरात साडेनऊ लाखांच्या चोरीतील भामटा अवघ्या बारा तासात गजाआड

चाकुर तालूक्यातील नळेगाव येथील एका घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण नऊ लाख 57 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी चाकुर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास चाकूर पोलिसांनी गतीने तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी उमर मुनवर मुजावर (वय 20,रा.नळेगाव) याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

thief of 9 lakhs in latur was arrested in just twelve hours
लातुरात साडेनऊ लाखांच्या चोरीतील भामटा अवघ्या बारा तासात गजाआड
author img

By

Published : Aug 29, 2022, 2:00 PM IST

लातूर चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे घरपोडी करून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास करुन पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्याला चाकुर पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मुद्देमालासह गजाआड केले आहे. चाकूर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी चाकुर तालूक्यातील नळेगाव येथील एका घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण नऊ लाख 57 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी चाकुर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास चाकूर पोलिसांनी गतीने तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी उमर मुनवर मुजावर (वय 20,रा.नळेगाव) याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेले दागिने, रोख रक्कम असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.