ETV Bharat / state

मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले; लातुरकरांना दिलासा - लातूर मांजरा धरणाचे दरवाजे

लातुरकरांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.

the two gates of the manjara dam opened in latur
मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले; लातूरकरांना दिलासा
author img

By

Published : Nov 3, 2020, 5:21 PM IST

लातूर - मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीत असले तरी लातुरकरांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. केवळ पिण्याचे पाणीच नाही, तर येथील एमआयडीसी आणि शेतीला देखील याचा धरणाचा मोठा आधार आहे. गत आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले होते, तर पाण्याची आवक कायम असल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांचा रिपोर्ट

पावसाळ्याच्या तोंडावर मांजरा धरणात केवळ मृतसाठा होताच, शिवाय केवळ 15 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे लातुरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजनही सुरू केले होते. पण वरुणराजाची कृपादृष्टी झाली आणि धरण भरले. 224 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणात झाला आहे. शिवाय, उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीतून पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चार वर्षानंतर हे दृश्य लातूरकर अनुभवत आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटला आहेच, शिवाय नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. येथील एमआयडीसीला देखील याच धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात का होईना, धरण भरले असल्याने लातुरकरांसह जिल्हाप्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढली आहे. गेल्या चार वर्षानंतर प्रथमच नदीपात्रात धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय पाण्याची आवक वाढली, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला आहे.

ऊसाचे क्षेत्र वाढणार

शेतीला पाणी मिळावे याच उद्देशाने धरणाची बांधणी झाली होती. मात्र, काळाच्या ओघात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आणि शेतीऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. मात्र, आता धरण भरले असल्याने उस्मानाबाद, बीड तसेच लातूर जिल्ह्यातील मांजरा पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या ऊस लागवडीस प्रारंभही झाला आहे.

योग्य नियोजनही गरजेचे

गतवर्षी भर पावसाळ्यातही लातुरकरांना 10 दिवसांतून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली होती. शिवाय टँकरची संख्या वाढली होती. तीव्र पाणीटंचाईचा सामना लातूरकरांनी केला केला. आता धरण पूर्ण क्षमतेने भरले असले, तरी त्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.