मुंबई (Thackeray Vs Shinde) : आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केलीयं. इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत नुकतीच झाली. यानंतर शिंदे सेनेकडून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरबाजीला ठाकरे गटानेसुद्धा बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलयं. यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दोन्ही गटांत बॅनरवॉर पाहायला मिळतय. (Bannerwor in Mumbai)
शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवचले : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद ठाकरे गटाला देण्यात आलं होतं. यामुळे शिंदे गटाला आयतं कोलीत मिळाल्याने त्यांनी ठाकरे गटाला बॅनरच्या माध्यमातून लक्ष्य केलं होतं. मुंबईतील अनेक भागात शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. (Shivsena controversy) बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो दाखवण्यात आला होता. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत असताना 'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' या आशयाच्या मजकुराचे बॅनर लावून शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचण्याचं काम केलं होतं.
ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर : मुंबईत शिंदे गटाने ठाकरे गटाविरोधात अनेक ठिकाणी बॅनर लावले होते. याला आता ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलय. ठाकरे गटाकडून दादर परिसरात, 'मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' या आशयाचं मोठं बॅनर लावलयं. भाजपासोबत गेलेल्या शिंदे गटाला हिणवण्याचं काम या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलयं. हे बॅनर आता प्रशासनाकडून काढण्यात आलयं.
मुंबईत बॅनरवॉर नवीन नाही : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईतील राजकारणातील ठाकरे कुटुंबाचे राजकारणतील महत्व सगळ्या देशाला माहीत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसे स्थापन केली त्यावेळी सुद्धा मनसे विरुद्ध शिवसेना बॅनरवॉर पाहायला मिळालं होतं. शिवसेना महाविकास आघाडीत सामिल झाल्यानंतर मनसे विरुद्ध शिवसेना असे बॅनर मुंबई झळकले होते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतरही दोन्ही गटाकडून वारंवार बॅनरच्या माध्यमातून एकमेकांना डिवचण्याचं काम केलं जात होतं. शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देखील दोन्ही गटाकडून एकमेकांना बॅनरच्या माध्यमातून चिमटे काढण्यात आले होते. निवडणुका जवळ आल्यानंतर मुंबईत बॅनरवॉर रंगल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यावेळी बॅनरवर कोणते मुद्दे बॅनर वर झळकतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
- Sanjay Raut Criticized BJP : तुमच्या पक्षश्रेष्ठींनी युती तोडली, भाजपाचं दुकान डुप्लिकेट - संजय राऊत यांचा घणाघात
- Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून ठाकरे गट, भाजप आमदारांमध्ये खडाजंगी
- Uddhav Thackeray News : देवेंद्र फडणवीस हे मास्टर मंत्री, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्ही घरी...चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार