ETV Bharat / state

Bribe : तीन हजाराची लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात - भीमराव निलप्पा चव्हाण लाच घेताना पकडले

वृद्ध शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना निलंगा तालुक्यातील मौजे केळगावचे तलाठी भीमराव निलप्पा चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंगा पोलिसात लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribe
Bribe
author img

By

Published : Jun 15, 2023, 4:30 PM IST

लातूर : निलंगा तालुक्यातील मौजे केळगावचा तलाठी भीमराव निलप्पा चव्हाण यास एका वृद्ध शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 हजार रुपये लाचेची मागणी : एक 67 वर्षीय वृद्ध शेतकरी तसेच त्याच्या पुतण्याची निलंगा तालुक्यातील मौजे राठोडा येथे 80 आर कुळाची जमीन आहे. त्या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीस पत्राच्या आधारे विरोधी पार्टीने फेरफार नोंदविण्यासाठी तलाठी भीमराव चव्हाण यांच्याकडे अर्ज केलेला होता. यातील वृद्ध शेतकरी, त्यांचा पुतण्या यांनी सदर अर्जास आक्षेप नोंदविण्याची तलाठ्याकडे तक्रार केली होती. परंतु त्या वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून घेण्यासाठी तलाठ्यांनी पैसे मागितले होते. वृद्ध शेतकऱ्याच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून तलाठी भिमराव चव्हाण यांनी त्या वृद्ध शेतकऱ्यास पंचासमक्ष सुरुवातीस 6 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

भीमराव नीलपा चव्हाण यांना रंगेहाथ पकडले - त्याप्रमाणे सदरील वृद्ध शेतकरी तलाठी भीमराव चव्हाण यांच्या निलंगा येथील तलाठी कार्यालयात मागणी केलेली लाचेची रक्कम 3 हजार रुपये देण्यासाठी गेले होते. तेव्हा तलाठी चव्हाण यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी तलाठी भीमराव नीलपा चव्हाण यांना रंगेहाथ पकडले.

तलाठ्यावर गुन्हा दाखल : सदरील आरोपी तलाठी भीमराव चव्हाण यांच्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लातूरचे उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी 'ई-टीव्ही भारत'शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले आहे. सदरची कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे , लातूरचे उपाधिक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुली यांच्या टीमने केली आहे.

हेही वाचा - Nashik ACB Action: मनपा शिक्षण अधिकारी धनगर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.