ETV Bharat / state

'ती' मुलगी स्टोव्हच्या भडक्यानेच जखमी ; पोलीस अधिक्षकांची माहिती - स्टोव्हचा भडका उडाल्याने तरुणी जखमी

लातूर शहरातील ज्योतीनगर परिसरात शुक्रवारी एक तरुणी 15 टक्के भाजली होती. या तरुणीला जाळण्यात आले की, ती जखमी झाली यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. अखेर २४ तासानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे

latur crime Latur burn case
लातूरात दुध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने तरुणी जखमी
author img

By

Published : Feb 8, 2020, 6:00 AM IST

लातूर - शहरातील ज्योतीनगर परिसरात शुक्रवारी एक तरुणी 15 टक्के भाजली होती. या तरुणीला जाळण्यात आले की, ती जखमी झाली यावरून शंका उपस्थित केली जात होती. अखेर २४ तासानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. तरुणीच्या आणि कुटुंबीयांच्या जबाबावरून आणि प्राथमिक तपासानंतर, ही तरुणी स्टोव्हवर दूध तापवत असताना स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले आहे.

लातूर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... लातुरात १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटविले?

लातूर शहरातील ज्योतीनगर येथील एका तरूणीचा चेहरा भजल्याने अनेक तर्क-वितर्क मांडले जात होते. नेमके या घटनेमागचे सत्य काय ? असा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी मुलीची आई आणि नातेवाईक तसेच शेजारच्यांचे जवाब घेतले. त्यावरून दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाला आणि त्यामध्ये ती भाजली, असे सांगितले. मात्र, मागील २४ तासांत पोलिसांनी आपली बाजू मांडली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी दोन वेळा नातेवाईकांचे जवाब घेतले. तसेच शुक्रवारी या तरुणीचाही जबाब घेण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी, सदर मुलगी दूध तापवत असताना स्टोव्हचा भडका उडला आणि त्या दुर्घटनेत ती जखमी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही

Intro:बाईट : डॉ. राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक लातूर

स्टोव्हच्या भडक्यानेच तरुणी जखमी ; अखेर पोलिसांनी दिला दुजोरा
लातूर : लातुरातील ज्योती नगर परिसरात एका तरुणीला जाळण्यात आले की ती स्वतः जखमी झाली यावरून साशंका उपस्थित केली जात होती. अखेर २४ तासानंतर पोलिसांनी समोर येऊन याबाबतच्या घटनेची माहिती दिली आहे. स्टोव्हवर दूध तापविताना भडका झाला आणि यामध्येच ती जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले आहे.
Body:शहरातील ज्योती नगर येथील गायत्री साखरे हिचा चेहरा भजल्याने तर्क- वितर्क मांडले जात होते. नेमके घटनेमागचे सत्य काय असा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी मुलीची आई आणि नातेवाईक तसेच शेजारच्यांचे जवाब घेतले आहेत. यावरून दूध तापविताना स्टोव्ह चा भडका झाला आणि यामध्ये ती १५ टक्के भाजली आहे. मात्र,गेल्या २४ तासांत पोलिसांनी आपली बाजू मांडली नव्हती आणि दोन वेळा नातेवाईकांचे जवाब घेतले त्यामुळे घटनेमागचे रहस्य काय असा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनीच गायत्री ही दूध तापवत असताना स्टोव्हचा भडका झाला आणि ही दुर्घटना झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यानंतरही स्टोव्ह वर दूध तापविणे... पोलिसांची सावध भूमिका यावरून काही सवाल कायम आहेत. Conclusion:एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.