लातूर - कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, तसेच या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात शेतीच्या कामासाठीची गर्दी पुन्हा होणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ८ ते १३ मे दरम्यान 6 दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
सहा दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन -
गेल्या काही दिवसांपासून शनिवार व रविवार असे दोन दिवस 'विकेंड लॉकडाऊन' लागू करण्यात आला आहे. या कालावधीत किराणा मालाची दुकाने, भाजी व फळ विक्रीसही बंदी करण्यात आलेली आहे. विकेंड लॉकडाऊनकरून तीन आठवडे उलटले तरी कोरोना बाधितांची संख्या फारशी कमी होत नसल्याने आता 6 दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. 8 ते 13 मे या कालावधीत केवळ औषधे, दूध व पाणी याचीच विक्री करता येणार आहे. वर्तमानपत्र वितरणास परवानगी आहे. परंतू या व्यतिरिक्त अन्य कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
जनतेने लॉकडाऊनचे कडक पालन करावे -
आगामी 15 मेनंतर शेतीच्या कामाची लगबग सुरू होईल. पेरणीच्या पूर्वतयारीसाठी शहरातील बाजारात बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी गर्दी होईल. शिवाय आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णांची संख्या कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले असून जनतेने याचे कडक पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकर मोफत लसीपासून वंचित; भाजप खासदाराचा आरोप