ETV Bharat / state

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड; भाजपची प्रतिष्ठा पणाला - latur news

दोन महिन्यांपूर्वीच मनपामध्ये अधिकचे संख्याबळ असतानाही भाजपला सत्ता गमवावी लागली होती. राज्याच्या राजकारणात होत असलेल्या बदलाचा परिणाम स्थानिक स्वराज्यमध्ये जाणवू लागला आहे.

selection-of-zp-chairman-today-in-latur
selection-of-zp-chairman-today-in-latur
author img

By

Published : Jan 6, 2020, 12:19 PM IST

लातूर- जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी बदलती राजकीय समीकरणे पाहता आजच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत काय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी लोकप्रतिनिधींसह सर्व सदस्यांची बैठक एका हॉटेलमध्ये घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी या निवडीत महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड

हेही वाचा- 'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

दोन महिन्यांपूर्वीच मनपामध्ये अधिकचे संख्याबळ असतानाही भाजपला सत्ता गमवावी लागली होती. राज्याच्या राजकारणात होत असलेल्या बदलाचा परिणाम स्थानिक स्वराज्यमध्ये जाणवू लागला आहे. महानगरपालिके पाठोपाठ जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार म्हणूनच खासदार रावसाहेब दानवे यांनी सदस्यांची बैठक घेऊन त्यांना विश्वास देण्याचे काम केले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील भाजप अंतर्गत याचा फटका या निवडीत होणार का? यामुळेच सर्वांना एका छताखाली घेऊन बैठक घेतली असल्याचे बोलले जात आहे. 57 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, बदलती परिस्थिती यामुळे सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजप पक्षासमोर असणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे काम पाहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी 2 नंतर ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

Intro:लातूर जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडी ; भाजप - महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला
लातूर : जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता असली तरी बदलती राजकीय समीकरणे पाहता आजच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी लोकप्रतिनिधीसह सर्व सदस्यांची बैठक एका हॉटेलमध्ये घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी या निवडीत महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Body:दोन महिन्यापूर्वीच मनपा मध्ये अधिकचे संख्याबळ असतानाही भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. राज्याच्या राजकारणात होत असलेल्या बदलाचा परिणाम स्थानिक स्वराज्यमध्ये जाणवू लागला आहे. महानगपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार म्हणूनच खा. रावसाहेब दानवे यांनी सदस्यांची बैठक घेऊन त्यांना विश्वास देण्याचे काम केले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील भाजपातील अंतर्गत याचा फटका या निवडीत होणार का आणि यामुळेच सर्वांना एका छताखाली घेऊन बैठक घेतली असल्याचे बोलले जात आहे. 57 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, बदलती परिस्थिती यामुळे सत्ता कायम ठेवण्याचे आवाहन पक्षासमोर असणार आहे.

Conclusion:पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे काम पाहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी 2 नंतर ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.