लातूर - जळकोट तालुक्यात एक चौदा वर्षीय शाळकरी मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना चारजणांनी तिचा रस्ता अडवून विनयभंग केला. या विनयभंग करणाऱ्या टोळक्यांनी तिला त्यांचे नाव सांगू नये याबाबत धमकी दिली. मात्र पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून जळकोट पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले असतानाही आरोपी अद्याप फरार आहेत.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
सचिन कोडिंबा मुंडे, बालाजी रामचंद्र केंद्रे, शुभम अशोक केंद्रे, नामदेव किशन जायेभाये, अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चारही जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच जळकोट पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश सोडांरे आणि पथकाने संबंधीत गावात जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागताच आरोपी फरार झाले आहेत.
हेही वाचा... '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'