ETV Bharat / state

कोरोपासून बचाव : पोलीस ठाण्यात 'स‌ॅनिटायझर टनेल' तर पोलीस व्हॅनमध्ये 'सॅनिटायझर शॉवर' - पोलीस

कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर स‌ॅनिटायझर टनेल तर पोलीस व्ह‌ॅनमध्ये सॅनिटायझर शॉवर बसवण्यात आला आहे.

Sanitizer tunnel at Latur Shivaji Nagar police station
लातूर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात 'स‌ॅनिटायझर टनेल'
author img

By

Published : Apr 10, 2020, 5:26 PM IST

Updated : Apr 10, 2020, 8:05 PM IST

लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावे हे सांगण्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा धोका असल्याने, 'कोरोना'पासून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून एक उपक्रम राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात सतत कर्मचाऱ्यांची वर्दळ असल्याने शिवाजी नगर ठाण्यात थेट सॅनिटायझर टनेल बसवण्यात आले आहे. पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने हा निर्णय घेतला असून शिवाजी नगर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील अशा प्रकारचे पहिले पोलीस ठाणे आहे.

हेही वाचा... MAHA CORONA LIVE : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 380, आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू

नांदेड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या पोलीस ठाण्यात सातत्याने नागरिकांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची देखील वर्दळ असते. शिवाय सध्या संचारबंदी लागू असल्याने ठाण्याचे कर्मचारी हे बंदोबस्तासाठी रस्त्यावर आले. त्यामुळे त्यांचा देखील अनेक नागरिकांसोबत बातचीत वगैरे करताना संबंध येतो आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे सॅनिटायझर फॉग हाऊस बनवण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करणारे शिवाजी नगर पोलीस ठाणे लातूर जिल्ह्यातील पहिलेच पोलीस ठाणे आहे. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले आहे. एवढेच नाही पोलीस व्हॅनमध्येही सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाबरोबरच जिल्हा पोलीस दलाने रूट मार्च करून लातूरकरांनी सध्याच्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.